Saturday, January 8, 2011

पाखरे ...................


भरारी घेत जग मुठीत करताना आपण गरुड झेप घेतो पण ज्या चिमण चोचीतून ज्यांनी आपल्याला घास भरवला ज्यांच्या मुळे आपल्या पंखांना बळ मिळाले त्यांना विसरू नये त्यांना फक्त आवाज नको स्पर्श हि हवा ..
आज जेंव्हा मागे वळून पाहते तर लक्षात येते कि आपण त्या घरट्यातून केंव्हाच बाहेर पडलोय . सृष्टीचा नियमच आहे हा पण तरीही कुठेतरी एक खंत का वाटते कि त्या घरट्यातल्या पाखरांना पिल्लांनी सोडलय तर ते घरटे एकट झालय ? किंवा आता हीच योग्य वेळ आहे त्या पाखरांना एकट सोडायची त्यांना आता त्यांचे स्वतःचे आयुष्य स्वतःसाठी जगू देण्याची ?  कारण पिल्ले बाहेर पडतात हि आपले घरटे स्थापन करायला आपले अतित्व या जगा समोर  मांडायला मग का मागे वळून पाहिल्यावर एक खंत टोचतेय? 
पिल्लांना घास भरवण्यात ज्यांनी आपल्या पंखातील अर्धे बळ हरवलेय तर त्या उरलेल्या बळावर एक नवीन आयुष्याची सुरुवात करायसाठीच आता हे पिल्ले झटताहेत ..
आणि आयुष्यभर झटतील
हि  एका घरट्यांचीच  नव्हे   तर अनेक घरट्यांची गोष्ट असू शकते म्हणूनच पुन्हा म्हणतेय त्यांना आवाजच नको तर स्पर्शही हवा .................
ऋचा